Tea House ; महाराष्ट्र स्वीट हाऊस ते पहिलवान टी हाऊस रस्ता मोकळा करण्याची मागणी
नांदेड l नांदेड शहरात वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामध्ये देगलूर नाका परिसरात तर प्रचंड वाहतुकीचा ताण असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दररोज होत असते. पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले आहे.
सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होतच असते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महानगरपालिका अतिक्रमण काढत नाही आणि वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरत देखील नाही त्यामुळे नांदेडची वाहतूक व्यवस्था ही भगवान भरोसेच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण वाहतूक कोंडी झाल्यानंतर सक्रियपणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर दिसणे दुरापास्त झाले आहे.
मागील अनेक दिवसापासून देगलूर नाका ते पहिलवान टी हाऊस या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता दोन्हीही बाजूनी संकुचित करण्यात आला आहे त्यामुळे रहदारीस मोठ्या प...
