राज्यातील शक्तिपीठ जोडणाऱ्या रेल्वे तरी सुरू करा – प्रवाशांची मागणी -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असून, हा महामार्ग झाला नाही तरी चालेल; पण, राज्यातील शक्तिपीठ देवस्थानांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या तरी सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर ते चंद्रपूर आणि परळी वैजनाथ ते नागपूर या दोन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे.
आदिलाबाद, नांदेड या मार्गावर मागील काही वर्षात एकही नवीन गाडी सुरू झाली नाही. याउलट काझीपेठ ते मुंबई मार्गे वणी, आदिलाबाद, किनवट, नांदेड ही साप्ताहिक रेल्वे बंद करण्यात आली.
विदर्भ, तेलंगणा, मराठवाड्याला विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर मराठवाड्याच्या शेवटच्या टोकाला आदिलाबाद ते नांदेड मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे किनवट हे रेल्वेस्थानक आहे. असे असतानाही नव्या गाड्यांचा वाणवा आहे.
परळी ते आदिलाबाद या डेमू गाडीची आसन व्यवस्था गैरसोयीची आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत...
