Demand for status of pilgrimage : श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी -NNL
नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पय्याबोधी थेरो यांनी केली. त्यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत करूणानंद, भदंत महविरो भदंत पंय्यानंद, भदंत धम्मशिल, भदंत धम्मधर, भदंत हर्षबोधी, भदंत शांतिरत्न, भदंत मोग्गलायन, भदंत मुदितानंद, भदंत पंय्यारत्न आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे सर्वेसर्वा भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे जाऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात खुरगाव श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासमोरील गायरान जमीन ही श्रामनेर शिबिरासाठी विपश्यना ...
