Sunday, June 28

Tag: Demand for attention

Himayatnagar Rural Hospital : हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव; रुग्णांचे हाल; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

Himayatnagar Rural Hospital : हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव; रुग्णांचे हाल; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अपुरा वैद्यकीय अधिकारी व परिचारिका स्टाफ, लाखो रुपयांची आधुनिक यंत्रसामग्री बंद अवस्थेत धूळखात पडलेली आणि जवळपास दोन वर्षांपासून कोट्यवधींची नवी इमारत ताब्यात न दिल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहर व ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात; मात्र येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व पुरेसा स्टाफ नसल्याने रुग्णांना उपचाराविना परत पाठवले जात असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफीसारख्या तपासण्या उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांना खासगी दवाखान्यांकडे वळवले जा...
error: Content is protected !!