Nitin Gadkari : 75 वर्षात काँग्रेसने फक्त जातीपातीचा राजकारण केलंय विकासाला प्राधान्य दिले नाही – नितीन गडकरी यांची टीका -NNL
उमरखेड, अरविंद ओझलवार| 75 वर्षाच्या काळात काँग्रेसने ग्रामीण भागातील विकास कामाला प्राधान्य दिले नसून जातीपातीचा राजकारण केला फक्त शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले त्यांच्या सोबतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार हमी देत राहिले होते त्यामुळे काँग्रेस पक्षावर अशी वेळ आली असल्याची खणखणीत टीका उमरखेड येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली .
भाजपाचे किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष माधव सुपारे , माजी आमदार उत्तमराव इंगळे, आमदार नामदेव ससाने ,अंबादास साकळे, महेंद्र मानकर, महेश काळेश्वरकर, चितांगराव कदम, आरती फुफाटे सह आदींची मंचावर उपस्थित होती . पुढे बोलताना गडकरी म्हणाले जातिवादावर निवडणूक लढविणे ही आजची परिस्थिती नाही काँग्रेस पक्ष जातीवादाचे विष पेरून राजकारण करत जात आहे. त्यांनी घराणे शाही जोपासली आहे तर...
