Prakash Abitkar ; हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला सहकार्य करावे : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई l हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधांचे सेवन करून हत्तीरोगापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
आरोग्यभवन येथे आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस डॉ. नितीन अंबाडेकर सर संचालक, डॉ. बबिता कमलापूरकर मॅडम , सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग), डॉ. प्रेमचंद कांबळे सहायक संचालक, हत्तीरोग तसेच विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा संबंधित रुग्णांनी...
