Congress! : काॅग्रेसकडून मित्रपक्षांच्या दिवंगत नेत्यांचाही सोयीनुसार वापर – NNL
नांदेड| आगामी नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून, सर्वच पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांकडून आपल्या प्रसिद्धीपत्रक, बॅनरमध्ये मित्रपक्षांच्या दिवंगत व कार्यरत नेत्यांचा सोयीनुसार वापर करित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंंत कार्यकर्त्यातून नाराजीसह संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.
महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नांदेड लोकसभा मतदार संघातील खा.वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी त्यांचे सुपुत्र प्रा.रविंद्र चव्हाण यांना काॅग्रेसकडून उमेदवार मिळाली असून, पोटनिवडणूकीसह या लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी काॅग्रेसनेच उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस प...
