Maharana Pratap | वीर महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसराचे संपूर्ण सुशोभिकरण करा -NNL
नांदेड| राष्ट्र महापुरुष वीर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याखालील चबुतरा व परिसरातील संपूर्ण सुशोभीकरणासह पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मजबूत सीडीची कायमस्वरुपी व्यवस्था करून शहरातील अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाच्या धर्तीवर या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालावी, अशी मागणी पुतळा उपसमितीचे अध्यक्ष माधवसिंह चरणसिंह परमार यांच्या नेतृत्वाखालील श्री क्षत्रिय समाज सचिव बिरजुसिंह गहेरवार,कोषाध्यक्ष बद्रिसिंह काथी, सहसचिव सुरेशसिंह परमार, अजिवन सदस्य मनोजसिंह ठाकुर, समाज सेवक तारूसिंह कौशिक, मोहनसिंह कच्छवा, बरजोरसिंह गहेरवार आदींच्य शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.
राष्ट्र महापुरुष शुरवीर महाराणा प्रतापसिंसहजी भव्य प्रतिमा (पुतळा) उपसमितीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की, सदैव राष्ट्रभक्ती आणि स...
