Meghna Bordikar : गतिशील व दायित्वपूर्ण प्रशासनाचे 100 दिवसांचे नियोजन पूर्ण करा : मेघना बोर्डीकर
नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सात सूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतीशील व दायित्व पूर्ण अंमलबजावणी करा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी आज येथे केले.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा नांदेड येथील आजचा प्रथम दौरा होता. त्यांनी नियोजन भवन येथे आज विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार अजित गोपछडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अधीक्षक अभियंता महावितरण, महापारेषण, कार्यकारी अभियंता जलजीवन मिशन, पा...
