Mla. Baburao Kadam Kohlikar : पारितोषिकेतून स्पर्धा निर्माण होतात; स्पर्धेतून उच्च पदस्थ अधिकारी तयार होतो – आ. बाबुराव कदम कोहळीकर
हदगाव, शेख चांदपाशा| सध्याचे युग स्पर्धेचे आहे, स्पर्धेच्या युगात पारितोषिक मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. अश्या मेहनतीच्या कार्याची पोच पावती म्हणून पारितोषिक मिळते त्यातूनच उच्च पदस्थ अधिकारी तयार होतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने सहभागी होऊन पारितोषिक पटविण्यासाठी जिद्ध चिकाटी ठेवावी असे उदगार हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Mla. Baburao Kadam Kohlikar) यांनी काढले.
हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आदर्श शिक्षक स्व. नरहरी यादवराव सुकापुरे यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सत्कार व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, पारितोषिक मिळव...
