Ganeshotsav ; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार – NNL
नांदेड| राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकतेसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिम...
