Cleanliness is Service” ; “स्वच्छता ही सेवा” एक दिन एक घंटा एक साथ अभियानांतर्गत नांदेड विभागात भव्य श्रमदान मोहीम
नांदेड l स्वच्छता ही सेवा अभियानाचा एक भाग म्हणून नांदेड विभागात ४७ ठिकाणी भव्य श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमामध्ये ६९७ पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला आणि स्वच्छता व स्वास्थ संवर्धनासाठी एकत्रितपणे कार्य केले.
ही श्रमदान मोहीम नांदेड, पुर्णा, परभणी, अकोला, बोल्ड, जालना, औरंगाबाद, नागरसोल, सहस्त्रकुंड, थेरबन, रोटेगाव, रंजनई, नांदापूर, तारूर, कतरोड, दिनगाव, हिंगोली, कोडी, अमनवाडी, भोकर, बदनापूर तसेच विभागातील इतर अनेक स्थानकांवर व वसाहतींमध्ये आयोजित करण्यात आली.
मोहीमेअंतर्गत प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट, स्टेशन परिसरांची स्वच्छता, वृक्षारोपण, वसाहती व नाल्यांची साफसफाई, तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील कचऱ्याचे संकलन व व्यवस्थापन करण्यात आले. तसेच, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे, पर्यावरणपूरक पद्धती अवलंबणे...
