Arrest of the founder of the company : खोट्या बिलांद्वारे ६४.०६ कोटीच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा; कंपनीच्या सूत्रधारास अटक -NNL
मुंबई| खोट्या बिलांद्वारे रू. ६४.०६ कोटीच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिन्स गोयल, वय ५३ वर्षे यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त यांनी दिली आहे.
मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीवर वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात कंपनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता खोटी बिले आणि बोगस वाहतूक पावत्या जारी करत असल्याचे आढळून आले. त्याद्वारे कंपनीने रूपये ६४.०६ कोटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून शासनाची ...
