Wednesday, May 13

Tag: Citizens of Vilakha expressed their anger

Abhijitnagar | अभिजितनगरला घातला असुविधांनी विळखा नागरिकांनी व्यक्त केला संताप – NNL

Abhijitnagar | अभिजितनगरला घातला असुविधांनी विळखा नागरिकांनी व्यक्त केला संताप – NNL

नांदेड
नांदेड| शहरातील अभिजितनगर भागात रस्ते, नाली यासह अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. महानगर पालिका प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शहरातील अभिजितनगर या भागात नव्याने वसाहत निर्माण होत आहे. मात्र पक्के रस्ते नाहीत, नाल्या तयार केल्या आहेत परंतु त्यामध्ये कचरा साचला आहे. नाल्यांची सफाई होत नसल्याने सांडपाणी जागोजागी साचत आहे. नालीवरील स्लॅबला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरील कचरा नालीमध्ये साचून पाणी तुंबत आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत ही वसाहत असताना देखील घंटागाडी या भागात फिरकत नाही. त्यामुळे साचलेला कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न येथील नागरिकांना पडतोय. महानगरपालिकेला आम्ही कर भरतो, मग मनपा सुविधा का देत नाही? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागरिकांनी त्याविषयी संताप व्यक्त क...
error: Content is protected !!