Saturday, June 27

Tag: citizens express anger against the electricity department

Nanded news : मिल्लत नगरमध्ये वीज संकट आणि अनियमितता, नागरिकांचा वीज विभागाविरुद्ध रोष

Nanded news : मिल्लत नगरमध्ये वीज संकट आणि अनियमितता, नागरिकांचा वीज विभागाविरुद्ध रोष

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l देगलूर नाका परिसरातील मिल्लत नगरमधील नागरिक सध्या वीजेच्या समस्येमुळे आणि वीज विभागाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे खूप त्रस्त आहेत. स्थानिकांनी वीज कर्मचाऱ्यांवर, विशेषतः मालटेकडी सबस्टेशनमधील कनिष्ठ अभियंता आणि एका लाइनमनवर गंभीर आरोप केले आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, हे लोक स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांना धमकावून बेकायदेशीरपणे पैसे गोळा करत आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या भागातील नागरिक सततच्या वीज कपातीमुळे हैराण झाले आहेत. डीपी क्रमांक 552 तीन वेळा बदलूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी तर तब्बल २९ तास वीज गुल होती आणि एक दिवसाच्या अंतराने आज पुन्हा संपूर्ण परिसर अंधारात आहे. या समस्येबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, ते लोड जास्त असल्याचे आणि वीज चोरीचे कारण देत टाळाटाळ करतात. त्यांचे म्हणणे आहे की, काही लोक आकडा टाकून वीज चोरत आहे...
error: Content is protected !!