Urvashi Mahadev Temple Nanded ; सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड भव्य कावड यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत..महिला युवक भाविक भक्तांचा प्रतिसाद
नवीन नांदेड l हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको व श्रीराम जन्मोत्सव समिती नांदेड यांच्या वतीने हिंदूं एकत्रिकरण साठी काढण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेत महिला,युवक,नागरीकासह भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होऊन मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला यावेळी पन्नास फुट कावड, महादेव तैलचित्र, महादेव पिंड या यात्रेचे आकर्षण होते,भजन टाळ यासह बमबम भोले,हरहर महादेव घोषणेने परिसर दणाणून गेला,6 जुलै रोजी श्री सिध्देश्वर महादेव मंदिर सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड येथे ही यात्रा आयोजित करण्यात आली होती, मुख्य मार्गावर विविध ठिकाणी फुलांची वृष्टी व चहा फराळ,केळी वाटप करून सहभागी भक्तांचे स्वागत करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही तिसऱ्या वर्षी हिंदू एकत्रीकरण साठी भव्य कावड यात्रेचा मार्ग श्रीसिद्धेश्वर महादेव मंदिर ND41 साईनगर बिडी कामगार कॉलनी सिडको ते हडको सिडको मार्ग महाराणा प्रतापसिहं चौक सिडक...
