Friday, May 15

Tag: Chief Minister’s approval

Approval of Chief Minister | पत्रकारांच्या महामंडळाला मुख्यमंत्र्यांची मान्यता -NNL

Approval of Chief Minister | पत्रकारांच्या महामंडळाला मुख्यमंत्र्यांची मान्यता -NNL

महाराष्ट्र
मुंबई| गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांचे स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये लढा दिला होता. अखेर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या या लढ्याला यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या महामंडळाला मान्यता दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांना बोलवून विधान भवनामध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये महामंडळासाठी शासकीय नियमावली तयार करून महामंडळाचे कामकाज सुरू केले जाणार आहे, असे ठरले. या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पत्रकाराला लाभ घेता येणार आहे. तेरा वेळा आंदोलन, सहा वेळा उपोषण केल्यानंतर अखेर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ने महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या पदरामध्ये महामंडळासारखा खूप मोठा विषय पाडून घेतला. मागच्या आठवड्यात राज्यातल्या तहसील, जिल्हाधिकारी ...
error: Content is protected !!