Minal Karanwal visits Malegaon Yatras : माळेगाव यात्रेस मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल भेट; श्रीखंडोबाचे घेतले दर्शन -NNL
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज श्रीक्षेत्र माळेगाव येथे आयोजित यात्रेस भेट देऊन आनंद व उत्साहाचा अनुभव घेतला. त्यांनी श्रीखंडोबाचे दर्शन घेतले आणि यात्रेतील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यात्रेदरम्यान घोडेबाजारातील विविध घोड्यांची पारख करत त्यांनी या अनोख्या परंपरेचे कौतुक केले. तसेच शंकरपट स्पर्धेस भेट देऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवले. यात्रेच्या चैतन्यमय वातावरणाने व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला वेगळाच रंग दिला आहे. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, पोलीस निरीक्षक नीलपञे, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे स्वीय सहायक शुभम तेलेवार उपस्थित होते. यात्रेतील गर्दी, विविध स्टॉलची सजावट व पारंपर...
