Bharat Gaurav Train : “भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” द्वारे पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
छत्रपती संभाजीनगर| भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत 9 जून 2025 पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे आढावा घेतला. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी श्री गुरूराज सोना यांच्यासह बैठकस्थळी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे देविदास टेका...
