निष्पक्ष चौकशीसाठी विशेष सरकारी वकील आणि एसआयटीप्रमुख बदला! : नाना पटोले -NNL
मुंबई| बदलापूरमध्ये झालेला प्रकार अत्यंत संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये दिलेली वागणूकही अत्यंत चीड आणणारी होती, पीडित कुटुंबालाच पोलिसांनी पुरावे मागितले यावरून शाळा व्यवस्थापनाला वाचवण्यासाठी शासनातील कोणाचातरी दबाव होता हे स्पष्ट होत आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्यांवर एवढा भयावह प्रसंग ओढवला त्याकडे गांभिर्याने व संवेदनशिलतेने पाहून तात्काळ कारवाई केली पाहिजे होती पण हे सरकार भावनाशून्य व गेंड्याच्या कातडीचे आहे. बदलापूरच्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बदलापूर पोलीस स्टेशनला जाऊन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व इतर पोलीस अधिका-यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली व आरो...
