Heavy Rain Alert ; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड l प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 27 जून 2025 रोजी दुपारी 13:57 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 01 जुलै 2025 या एक दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 01 जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या गोष्टी करा
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत अस...
