CEO Meghna Kavali : अधिका-यांनी समन्वयाने कामे करावीत -सीईओ मेघना कावली यांचे निर्देश
नांदेड| गट विकास अधिकारी यांनी आपल्या विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वयाने काम करावे. तसेच विविध योजनांची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज दिले.
जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख...
