Free health checkup for women | ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी -NNL
नांदेड| ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांसाठी सविता मंगल कार्यालय जांब जी. नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी व महिलांसाठीच्या शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 16 जुलै रोजी करण्यात आले होते. यासाठी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खतगांवकर, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. याशिवाय अयोग्यविषयक मार्गदर्शनासाठी डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी महिलांना सामोपदेशन केले. यावेळी ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅमचे खजिनदार तथा निमंत्रक अंबरीश कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.
हा कार्यक्रम महिलांना त्यांच्या आरोग्याची आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. याप्रसं...
