Thursday, May 14

Tag: Big bust of tractor theft

Nanded crime branch : ट्रॅक्टर चोरीचा मोठा पर्दाफाश; नांदेड गुन्हे शाखेची धडक कारवाई

Nanded crime branch : ट्रॅक्टर चोरीचा मोठा पर्दाफाश; नांदेड गुन्हे शाखेची धडक कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यात वाढलेल्या ट्रॅक्टर चोरीच्या घटनांना गुन्हे शाखेने मोठा धक्का देत ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ ट्रॅक्टर व २ मोटारसायकली असा एकूण १७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचत आरोपींचा माग काढला. विविध ठिकाणी झालेल्या कारवायांतून ट्रॅक्टर चोरीची साखळी उघडकीस आली. आरोपींकडून चोरीस गेलेले ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकाच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले असून, ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा बसला आहे. या यशस्वी कारवाईबद्दल ...
error: Content is protected !!