Nanded Farmars । शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल -NNL
नांदेड। शेतीसाठी लागणाया खर्चामुळे शेती नेहमी तोट्यात जाते आहे शेतकऱ्यांना सातत्याने ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकावर अनेक रोगांचे सावट, नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतीव्यवसाय व शेतकरी, अडचणीत सापडले आहेत. आज शेतकरी राजा हा नावापुरताच राहिला आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी शेती व्यवसायात उत्पन्न कमी, खर्च जास्त, म्हणून शेतकरी त्रस्त अशी अवस्था आज घडीला निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व लहान कृषी केंद्र चालकांच्या स्वातंत्र्यासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात सचिन कासलीवाल यांनी केली आहे..
शेतकरी जेव्हा बी-बियाणे, खते, किटकनाशके, ठिबक संच, मोटार पंप, ट्रॅक्टर खरेदी करतात तेव्हा त्यांच्याकडून ५ % ते २८ % जीएसटी विविध वसुल केला जातो, हा जीएसटी शेतकऱ्यांना परत कसा मिळतो ? तर तो मिळणारची नाही म्हणजे तो बोजा सरळ सरळ शेतकऱ्यांच्या माथी पडतो त्यामुळे शेतीचा उत्पादन...
