Thursday, May 14

Tag: Banner-hanging rampant

Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद… उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद… उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अस्ताव्यस्त व अनधिकृत बॅनर लावले जात असून, यामुळे उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र असून, केवळ थातुरमातूर कारवाई करून काही मर्जीतील लोकांना कुठेही बॅनर लावण्याची मुभा दिली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या अनियंत्रित बॅनरबाजीचा फटका थेट शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानदार, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना बसत आहे. रस्त्यांवर व चौकाचौकात लटकविलेले बी बांधलेले बॅनर वाहतुकीस अडथळा ठरत असून, शहरातील वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. त्याचबरोबर शहराचे विद्रुपीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते विविध चौक, रुग्णालय परिसर तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर अपघातां...
error: Content is protected !!