National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांना देशात तृतीय पारितोषिक प्राप्त
नांदेड| नुकताच नोएडा, दिल्ली येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय भारत सरकार आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सव मोठया थाटात संपन्न झाला. या युवा महोत्सवात देशातील ३६ राज्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने लोकगीत (समूह) या कलाप्रकारामध्ये देशातून तृतीय पारितोषिक प्राप्त करून बहुमान मिळवला. या कलाप्रकारात नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील संगीत विभागातील विद्यार्थी कलावंताने नांदेड जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरीय युवा महोत्सवात सुवर्णपदक प्राप्त करून राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झाली.
संगीत विभागाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या उत्कृष्ट कर्तृत्वाने यशाची उज्वल परंपरा कायम राखत या वर्षी विक्रम घडवला आहे. ही बाब विद्यापीठाच्या सर्व प्राध्यापक व अधिकारी यांच्यासाठी गौरवाची ठरली. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी रवाना झालेल...
