Acne secondary mineral theft from the roots of tambi : गौण खनिज चोरांकडून रात्री आणि सुट्टीच्या दिवशी पोखरला जातो टेंभीचा माळ -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| सामाजिक वनीकरण आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित व स्वार्थी कारभारामुळे हिमायतनगर टेभी रत्स्यावर असलेल्या पांडवकालीन अबाबकरच्या माळातून सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या झाडांची मोड - तोड करून जेसीबी मशीन व ४ ते ५ ट्रेकटर व टिप्परच्या सहाय्याने रात्रीला मुरुमाचे उत्खनन करून सुरु असलेल्या रस्ताकामावर टाकले जात आहे. या अवैद्य गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरणाला हानी पोंचत असून, इतिहासकालीन माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
हिमायतनगर शहरापासून दक्षिनेस असलेल्या टेभी, आंदेगाव, दरेसरसम, पवना रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या इतिहासकालीन आबाबकरचा माळ आहे. सदर माळातुन पांडवकालीन युगात माहूर गडाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आला होता असे जुन्या जाणकारातून सांगितले जाते. त्यामुळे या माळाला इतिहासकालीन महत्व असून, आजही अनेक जण या माळावर पूजा - अर्चना क...
