agricultural produce : किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू
नांदेड| केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग व उडिद खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी वरील नोंद, 7/12, आधारकार्ड, आधारलिंक बँक खाते इत्यादी आवश्यक कागदपत्रानुसार आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी अथवा NAFED ई-समृध्दी या मोबाईल ॲपद्वारे स्वंनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहूराज हिरे यांनी केले आहे. या खरेदी केंद्रावर फक्त एफएक्यु दर्जाचा शेतमालाची खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल स्वच्छ व चाळणी करून खरेदी केंद्रावर आणण्याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात 18.50 लाख मे.टन सोयाबीन, 33 हजार मे. टन मूग व 3.25 लाख मे. ट...
