Wednesday, May 13

Tag: at Maratala

MIDC : मारतळा येथील प्रस्तावित एमआयडीसीची स्थापना करा

MIDC : मारतळा येथील प्रस्तावित एमआयडीसीची स्थापना करा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी औद्योगिक क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर या दृष्टीने पुढचे पाऊल पडू शकते. या बाबीचा विचार करून मारतळा येथील प्रस्तावित असलेली एमआयडीसी स्थापन करा (Set up the proposed MIDC at Maratala) अशी आग्रही मागणी नांदेड चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज्‌च्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आज एका शिष्टमंडळाने केली. नांदेड चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज्‌चे अध्यक्ष डी.पी.सावंत यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत उपरोक्त मागणी केली. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, दि.13 जानेवारी 2025 मध्ये उद्योग विभागाकडून एक पत्र काढले असून त्यामध्ये लोहा तालुक्यातील मारतळा, कुंभारगाव व कापसी या गावामधील...
error: Content is protected !!