Mobile phone thieves : हिमायतनगर आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ
हिमायतनगर | शहरातील आठवडी बाजारात बुधवारी मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरून नेले. यामध्ये काही उच्चदर्जा आयफोनसह जवळपास दोन ते चार लाख रुपयांपर्यंतचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास १० ते १५ मोबाईल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज असून, अजून काही तक्रारी पुढे येण्याची शक्यता आहे.
हिमायतनगर शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून ते आंबेडकर चौक, ग्रामीण रुग्णालय, चौपाटी लकडोबा चौक यासह अन्य परिसरात विस्तार वाढला असुन, ग्रामीण भागातील नागरिक बुधवारी बाजार करण्यासाठी मोठी गर्दी करतात. या आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेत अनेकदा चोरट्यांनी मोबाईल चोरल्याच्या घटना घडल्या असल्या तरी बाजार दिवशी पोलिस प्रश...
