Army XI, BSF Jalandhar, Sai Excellency and Nagpur in semi-final : आर्मी इलेवन, बीएसएफ जालंधर, साईं एक्सेलेंसी आणी नागपुर उपांत्य फेरीत -NNL
नांदेड| श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जयंतीस समर्पित '51 वीं अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल आणी सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट' स्पर्धेत शनिवारी खेळण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आर्मी इलेवन जालंधर, बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (बीएसएफ) जालंधर, साईं एक्सेलेंसी संभाजीनगर आणी ऑडिटर जनरल (ए.जी.) नागपुर संघांनी आपल्या प्रतिस्पर्धीवर मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. रविवारी उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून, आर्मी इलेवन जालंधर विरुद्ध बीएसएफ जालंधर यांच्यात दुपारी 1 वाजता उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळला जाईल. तर दूसरा सामना दुपारी 3 वाजता साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध ए. जी. नागपुर संघाचा सामना होईल.
आज उपांत्य पूर्व फेरी अंतर्गत पहिला सामना सकाळी 9 वाजता आर्मी इलेवन जालंधर विरुद्ध कस्टम मुंबई संघात खेळला गेला. आर्मी इलेवन संघाने हा सामना एकतर्फा ठरवत कस्टम मुंबई संघाच...
