register e-pick inspection | सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी – NNL
नांदेड| पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विहीत कालावधीत आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
क्षेत्रीय स्तरावरुन (Real Time crop data) पीक पाहणी रियल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर डाटा/ माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत...
