Rangoli competition : रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन -NNL
नांदेड| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन कक्ष व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेडच्यावतीने मतदान जनजागृती उपक्रम मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रांगोळी स्पर्धा आज श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड च्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती .
रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. सर्व महिलानी मतदान केले पाहिजेत यासाठी रांगोळीमध्ये वेगवेगळे स्लोगनच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली . त्याचबरोबर सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच जिल्हा स्वीप प्रमुख तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्...
