Cemetery and graveyard encroachment : 1992 पासून स्मशानभूमी व कब्रस्तान अतिक्रमणात; 2400 लोकसंख्या असलेल्या आंदेगावला अंत्यविधीसाठी जागाच नाही
हिमायतनगर/नांदेड (विशेष प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तान ही जमीन सन 1992 पासून अतिक्रमणाखाली असून, तब्बल तीन दशकांपासून गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी स्वतःची हक्काची जागा मिळालेली नाही. विशेष म्हणजे सदर जमीन ही त्याच कुटुंबाने गावाच्या हितासाठी हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानासाठी दिली होती. मात्र आज दुर्दैवाची बाब अशी की, त्या कुटुंबालाच आणि संपूर्ण गावालाच बेवारस जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
आंदेगावची लोकसंख्या आज सुमारे 2400 च्या आसपास असूनही, गावात एकही सुरक्षित व अधिकृत अंत्यविधीची जागा उपलब्ध नाही. याबाबत माननीय जिल्हाधिकारी व माननीय तहसीलदार यांचे अतिक्रमण हटवून तात्काळ ताबा देण्याचे स्पष्ट आदेश असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने गावकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भूमिअभिलेख विभागाकड...
