Langar sahib : लंगर साहिबच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिविर व उद्या सालाना बरसीचा उत्सव – NNL
नांदेड| येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने उद्या ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव होणार आहे. या उत्सवा निमित्ताने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी सालाना बरसी उत्स वात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल झाले आहेत. उत्सवा ची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती लंगर साहिब चे प्रमुख जत्थे दार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी दिली.
लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येणार आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी स...
