Tuesday, June 30

Tag: and surrounding areas…? become smooth..!

Hadgaon : हदगाव शहर व परिसरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था कधी…? होणार सुरळीत..!

Hadgaon : हदगाव शहर व परिसरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था कधी…? होणार सुरळीत..!

नांदेड, सोशल वर्क
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहर व परिसरामध्ये राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे नव्याने झालेले काम पाहता नागरिकांना वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात या महामार्गांवर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. यावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस उपाय न झाल्याने नुकतेच नवीन पदभार झालेले पोलीस निरीक्षक संकेत दिघे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून ठोस कारवाईची अपेक्षा नागरिक करत आहेत. शहरात निजामकालीन मुख्य प्रवेश मार्ग केवळ एकच असून, या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूस सरकारी पादचारी मार्ग आहे जो अंबाळा गावाच्या हद्दीपर्यंत जातो. मात्र हा मार्ग काही प्रभावशाली लोकांनी बळकावलेला आहे. या गंभीर समस्येकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी कडून लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी ही समस्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत असल्याचे चित्र आहे. सध्या "प्रशासक...
error: Content is protected !!