After 27 years : तब्बल २७ वर्षांनंतर सजला गुरु-शिष्य व मैत्रीचा उत्सव !
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| विद्यार्थ्यांचे शालेय जीवन हे त्यांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात. कालांतराने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटा धराव्या लागतात आणि आपले आवडते शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर जावे लागते. पुन्हा कधीतरी ते शिक्षक, मित्र, मैत्रिणी भेटतील की नाही, याची शाश्वती पण नसतेः मात्र माहूर शहरातील श्री जगदंबा हायस्कूल च्या शाळेत १९९६/९७ मध्ये दहावीत शिकणाऱ्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल २७ वर्षांनंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली आणि या अविस्मरणीय आणि भावनिकक्षणांचे साक्षीदार झालेत.
माहूर येथील कपिलेश्वर धर्म शाळेच्या सभागृहात दि १५ मार्च रोजी या अनोख्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सेवानिवृत्त प्राचार्य मराठीचे शिक्षक अरूण कोरटकर. यांनी या स्नेहसंमेलनाचे यथोचित उद्घाटन केले.यावेळी बाबा गोडसे सर...
