Chief Executive Officer Meenal Karanwal : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी -NNL
नांदेड| राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील एकूण 1 हजार 399 लाभार्थ्यापेकी 746 लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु अद्यापपर्यत 651 लाभार्थ्यानी आधार पडताळणी पूर्ण करणे बाकी आहे. आधार पडताळणी बाकी असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी 5 डिसेंबर पर्यंत आधार पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत 34 हजार 600 कलाकार व साहित्यिक यांचा समावेश आहे. त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन अदा करण्याबाबत शासनाचे ...
