Nanded Girl Suicide : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या – NNL
नवीन नांदेड| गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविघालय विष्णुपुरी येथे सिव्हिल तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या भक्ती शरद पिंपळे २१ वर्षीय विद्यार्थिनीने मुलीच्या वस्तीगृहातील 307 खोलीतील पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचीही घटना ८ डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजुन 16 मिनिटां पुर्वी घडली असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत मुलीचे नाव कु. भक्ती शरदप्पा पिंपळे असे असून ती वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे. श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेत भक्ती ही स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होती.ती गुरू गोविंदसिंग महाविद्यालय मुलींचे वस्तिगृह येथे 307 रूम मध्ये रविवारी सकाळी खोलीतील अन्य मैत्रिणी नसल्याची संधी साधत तीने खोलीतील पंख्याला दोरीने गळफास घेवून ...
