Majhi Ladki Bahin Yojana revolutionized financial self-reliance among women : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची क्रांती : आदिती तटकरे – NNL
नांदेड| अत्यल्प आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक स्वातंत्र्याची नवी क्रांती आहे. स्वतःचे बँक अकाउंट, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसे, या स्वावलंबित्वामुळे, सक्षमतेमुळे समस्त राज्यात महिला जगतामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज येथे केले.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यासाठी आज त्यांचे नांदेडच्या श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दुपारी चार वाजता आगमन झाले. त्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही मेळाव्यात बोलताना त्यांनी रक्षाबंधनपूर्वी 16 व 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याची शाश्वती दिली. राज्यामध्ये एक कोटी 40 लक्ष अर्ज आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सव्वा कोटी अर्ज पात्र ठरले आहे. या सर्व पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाला ...
