Kinwat Mahur VidhanSabha give a chance youth leader Sachin Naik | किनवट माहूर विधानसभेच्या सर्वांनीं विकासासाठी युवा नेते सचिन नाईक यांना संधी द्या -NNL
नांदेड| किनवट माहूर विधानसभेमध्ये गेली आठ वर्षापासून सचिन नाईक मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना मदतीचा हात सचिन नाईक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येतो. सर्व सामान्य मतदार संघातील नागरिकांना कुठलीही अडचण दवाखान्याची असो की लग्नाची त्यासाठी सचिन नाईक मित्र मंडळ हे सदैव पुढे येऊन सहकार्य करण्याची भावना ठेवत असतो. त्यामुळे किनवट माहूर विधानसभेमध्ये युवा नेते म्हणून सचिन नाईक यांना संधी द्यावी अशी मागणी किनवट माहूर तालुक्यातील होताना पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी जवळपास 14 इच्छुक उमेदवार असून, विविध पक्षाकडून त्यांनी पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी हालचाली सुरू केले आहेत. पण सचिन नाईक हे मित्र मंडळाच्या माध्यमातून कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. तरी देखील आम्ही काहीतरी समाजाचे देणे लागतो या हेतूने गेली आठ वर्षापासून काम करत असल्याचा भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहे...
