setting up bird stops in soybean fields : सोयाबिनच्या शेतात पक्षी थांबे उभारण्याचे कृषी विभागाचे आवाहन -NNL
नांदेड| शेतकऱ्यांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी 'T’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. तसेच विविध किड आणि रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार विविध उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत उपाययोजना
तूर पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 5 टक्के निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे 50 मीटर अंतरावर शेतात उभारावेत. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी 5 स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत.
मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १...
