Saturday, June 27

Tag: “Administration is sleeping

Citizens angry due to dust : बारूळमध्ये रस्त्याचा गोंधळ; धुळीमुळं नागरिक संतापले – “प्रशासन झोपेत, नेते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप!”

Citizens angry due to dust : बारूळमध्ये रस्त्याचा गोंधळ; धुळीमुळं नागरिक संतापले – “प्रशासन झोपेत, नेते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप!”

नांदेड, महाराष्ट्र
बारूळ| कंधार तालुक्यातील महादेव मंदिर ते बारूळ कॅम्प हा अतिशय महत्त्वाचा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून धुळीच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्यावर सिमेंट काँक्रीट आणि नालीचे काम निकृष्ट पद्धतीने केल्याने ते काम बंद पडले. मात्र, सर्वात मोठी समस्या म्हणजे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उठणारी प्रचंड धूळ, जी आता स्थानिकांसाठी आरोग्याचा गंभीर प्रश्न बनली आहे. नागरिक सांगतात की, “या रस्त्यावर एखादा माणूस पाच मिनिटे थांबला तरी त्याचा चेहरा धुळीनं पांढरा पडतो. इतक्या धुळीत आम्ही राहत आहोत, पण प्रशासनाला आणि नेत्यांना काहीच देणंघेणं नाही.” स्थानिकांचा आरोप आहे की, प्रशासन झोपेत गेले आहे, लोकांच्या समस्यांकडे लक्षच नाही. अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देण्यात आली. तसेच वृत्तपत्रांतून वारंवार बातम्या देऊनही संबंधित विभागांनी दुर्लक्षच केले. ग्रामस्थांचा सांगणे आहे की, “नेतेमंडळी येतात, ...
error: Content is protected !!