Give justice to the staff of Eklavya Model Residency School | एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या – आदिवासी टायगर सेनेची मागणी – NNL
नांदेड| जवाहर नवोदय विद्यालय प्रमाणे महाराष्ट्र राज्यात सी.बी.एस.सी. शिक्षण पद्धतीने शिक्षण आदिवासी होतकरू मुलांना मिळावा, यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलची स्थापना आदिवासी विकास विभाग च्या वतीने करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून शाळा उत्कृष्ठ सुरू आहेत व आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी ह्या शाळेत परीक्षा देऊन टक्के वारी नुसार प्रवेश घेतला जातो. सुरुवातीच्या काळात एक दोन पदे वगळता सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले. त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे पण घेण्यात आले. २०१८ मधील कोवीड सेंटर मनून अश्या बऱ्याच शाळांना दिले.त्यात शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केली.
तसेच शाळेत जवळ पास ५ ते ६ वर्ष अल्पश्या पगारात काम करून घेतल्या नंतर ,आता त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याच्या मनसुभा राज्य सरकार चा असून, NEXT या कंपनी च्या वतीने न...
