समाजवादी पार्टी येत्या विधानसभा निवडणुकीत 35 जागा लढविणार! -ॲड रेवण भोसले -NNL
धाराशिव| आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये किमान 35 जागा लढविण्यात येतील असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली.
समाजवादी पार्टीचे सर्व राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या विविध आघाडीचे प्रमुख यांचे संयुक्त बैठक मुंबई येथील बेलार्ड इस्टेट येथील समाजवादी पार्टी मुख्य कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या 37 जागा जिंकून जे यश मिळवले आणि देशांमधील पक्ष लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवला त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश अखिलेश यादव ...
