Saturday, June 27

Tag: A young man was brutally murdered

Murdered : छेडछाडीच्या संशयावरून शेळगाव (नृसिंह) येथे तरुणाची निर्घृण हत्या

Murdered : छेडछाडीच्या संशयावरून शेळगाव (नृसिंह) येथे तरुणाची निर्घृण हत्या

नांदेड, क्राईम
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शेळगाव (नृसिंह) येथे रविवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत २८ वर्षीय तरुणाचा एका अल्पवयीन मुलाने धारदार चाकूने गळ्यावर व पाठिवर वार करून खून केल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. घटनेचा तपशील रविवार (दि. २८ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास संतोष परमेश्वर माटलवार (वय २८, रा. शेळगाव) हा आपला भाऊ व दोन मित्रांसोबत ग्रामपंचायत जवळील घराजवळ ओट्यावर गप्पा मारत बसला होता. याचवेळी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा तेथे आला. “माझ्या बहिणीच्या पाठीमागे लागू नको” असा जाब देत त्याने संतोषवर संताप व्यक्त केला. पूर्वीही याच संशयावरून त्यांच्यात वाद झाले होते. त्याच रागातून आरोपीने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढून संतोषच्या गळ्यावर व पाठिवर जबर व...
error: Content is protected !!