A protest march Kinwat : आदिवासी युवती सोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा संपन्न
किनवट, परमेश्वर पेशवे| नोकरी लावुन देतो असे आमिष दाखवित दिनांक १३ जानेवारी रोजी आदिवासी युवती सोबत येथिल आरोग्य सेवकाने व इतर तिन नराधमाने दराटी परिसरातील अभयारण्यात नेऊन बलात्कार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ (A protest march Kinwat) किनवट येथे आदिवासी जनजाती समाजाने आक्रोष मोर्चा दिनांक 18 जानेवारी रोजी काढण्यात आला. सदर मोर्चा शहरातील हुतात्मा गोंड राजे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा मोर्चा असंख्य महिला व नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आला.
आज दिनांक 13 जानेवारी रोजी घडलेल्या निषेधार्थ किनवट येथे आदिवासी जनजाती समाजाने भव्य असा आक्रोश मोर्चा दुपारी 1 वाजता काढण्यात आला यावेळी किनवट शहर व गोंकुंदा शहर व्यापारपेठ कडकडीत व्यापाऱ्यांनी स्वयंस्पुर्द बंद ठेवण्यात आले तर मोर्चा शांततेत संपन्न झाला . अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या असे नारे लावत आक्रोश मोर्चा हा गोंडरा...
