Sunday on cycle rally : संडे ऑन सायकल रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे
नांदेड| आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने “फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज” अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन 2 मार्च,2025 रोजी करण्याबाबत केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेडच्या वतीने दि.02 मार्च,2025 रोजी सकाळी 6.30 वा. “फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज” अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वार येथून करण्यात आले आहे.
या रॅलीचा मार्ग स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वार येथून सुरुवात होवून आयटीएम कॉलेज मार्गे-आयटीआय चौक- श्रीनगर- वर्कशॉप कॉर्नर मार्गे आनंदनग- वसंतराव नाईक...
