Wednesday, May 13

Tag: a comprehensive cleanliness

cleanliness drive in all the offices : मुख्‍यमंत्र्यांच्‍या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्‍हा परिषदेतील सर्व कार्यालयात व्‍यापक स्‍वच्‍छता मोहिम

cleanliness drive in all the offices : मुख्‍यमंत्र्यांच्‍या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्‍हा परिषदेतील सर्व कार्यालयात व्‍यापक स्‍वच्‍छता मोहिम

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| राज्‍याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत स्वच्छता हा महत्त्वाचा विषय असून शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये व्यापक स्वच्छता मोहिमेला सुरुवात (cleanliness drive in all the offices) करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावर यांची उपस्थिती होती. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालये व परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेमुळे कर्मचार्‍यांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून, स्वच्छता ही केवळ कर्मचाऱ्यांची नव्हे, तर सर्वांची जबाबदारी असल्याचा संदेश दिला गेला आहे. ...
error: Content is protected !!